Type Here to Get Search Results !

मोरगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उद्या


 

डिजिटल महाराष्ट्र : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील मोरगाव येथे महसूल विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत विशेष समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मोरगाव येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे मंगळवार दि. 12 मे रोजी हे शिबिर पार पडणार असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित विविध प्रश्नांचे निराकरण या माध्यमातून करण्यात येणार आहे.

मोरगाव महसूल मंडलातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी तसेच महिलांना महसुली सेवा व शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या रोहिणीताई कदम ढोले यांनी दिली आहे.

  या शिबिरात बारामतीचे प्रांत अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार स्वप्निल रावडे, निवासी नायब तहसीलदार नामदेव काळे, नायब तहसीलदार (उपविभागीय अधिकारी कार्यालय) प्रतिभा शिंदे, जिल्हा परिषद सदस्या रोहिणीताई कदम ढोले, गटनेते बाबासाहेब चोरमले, मोरगाव मंडल अधिकारी प्रमिला लोखंडे (मोरगाव) तसेच विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांच्या विविध महसुली अडचणी, दाखले, नोंदी, शासकीय योजना व इतर प्रश्नांवर मार्गदर्शन करून तत्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या शिबिराचे आयोजन मोरगाव मंडल अधिकारी तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.

या विशेष समाधान शिबिराचा लाभ मोरगाव मंडलातील सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला व शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments