Type Here to Get Search Results !

न्यू इंग्लिश स्कूल खलाटे वस्ती, लाटे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सोमनाथ जगन्नाथ जाधव यांची बिनविरोध निवड

 


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
न्यू इंग्लिश स्कूल, खलाटेवस्ती, लाटे येथे सन 2026-27 च्या वार्षिक शालेय नियोजनासाठी शनिवार दि. 20 जून रोजी शिक्षक व पालकांची संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सोमनाथ जगन्नाथ जाधव यांची तर उपाध्यक्षपदी अश्विनी गणेश कुंभार यांची निवड करण्यात आली.
यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक बारवकर यांच्या हस्ते समितीचे माजी अध्यक्ष भगवानराव पिंगळे यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी सत्कार स्वीकारून मनोगत व्यक्त केले. "इथून पुढील काळात शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच शालेय अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक व पालकांच्या सहकार्याने काम करेन," असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या बैठकीस प्रशालेतील शिक्षक टी.बी.बारवकर सर, ए.व्ही.हिरवे सर, ए.एम.खलाटे सर, ई.डी.शेळके सर, टी. डी.देवकाते सर, बी.एल.काळे सर, एस.एस.दानवले मॅडम, शेळके मॅडम यांच्यासह बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments