डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
पत्रकारांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करत मारहाणीची धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा भारतीय पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात आला. वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशनला निवेदन देऊन पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
भारतीय पत्रकार संघाच्या वतीने वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक जीवन मोहिते यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते साहेब यांच्याशी या विषयावरती प्रथम चर्चा करण्यात आली.
यावेळी भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे, बारामती तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक दीपक वारूळे, विनाद गोलांडे, महमद शेख, अजय पिसाळ, फिरोज भालदार, रमेश कदम, कृष्णमूर्ती जगताप आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी सोमनाथ जाधव यांनी उपस्थित पत्रकार बांधव व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांचे आभार मानले.

Post a Comment
0 Comments