Type Here to Get Search Results !

जयदादा पवार यांनी घेतली जालिंदर लकडे यांची सांत्वनपर भेट

 


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील गडदरवाडी येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते जालिंदर लकडे यांच्या मातोश्री स्वर्गीय रंजना रामचंद्र लकडे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे लकडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर जयदादा पवार यांनी गडदरवाडी येथे जालिंदर लकडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी लकडे परिवाराचे सांत्वन करत दिवंगत रंजना लकडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच या दुःखद प्रसंगी परिवाराला धीर देत आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

  जयदादा यांनी दिवंगत रंजना लकडे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आणि लकडे कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.

जालिंदर लकडे यांचा विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग राहिला आहे. ग्रामीण भागातील अनेक सामाजिक प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेत समाजकारणाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.



लकडे यांनी पंचायत समिती निवडणूक देखील लढवली असून राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी आपले योगदान दिले आहे. बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात त्यांचे सामाजिक कार्य विशेष उल्लेखनीय मानले जाते. विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती असते. समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे काम त्यांनी सातत्याने केले असून अनेक उपक्रमांच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य उभे केले आहे.

प्रा. लक्ष्मण हाके आणि महादेव जानकर, जयदादा पवार यांच्यासारख्या राज्यस्तरीय नेत्यांनी भेट देऊन सांत्वन व्यक्त केल्याने लकडे परिवाराला मोठा आधार मिळाला आहे. या भेटीदरम्यान परिसरातील कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थही उपस्थित होते.

दिवंगत रंजना रामचंद्र लकडे यांच्या निधनाने परिसरातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत असून विविध स्तरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments