डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुर्टी हद्दीतील भोसलेवस्ती येथे ओढ्याच्या खोलीकरणाच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच उत्साहात पार पडले. या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या रोहिणीताई कदम-ढोले यांच्या हस्ते करण्यात आले.
यापूर्वीही परिसरातील अनेक ओढ्यांचे रुंदीकरण व खोलीकरणाची कामे करण्यात आली असून उर्वरित कामेही टप्प्याटप्प्याने सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
याप्रसंगी मुर्टीच्या सरपंच कोमल जगताप, दूध संघाचे माजी व्हाईस चेअरमन संतोष शिंदे, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब जगदाळे, उपसरपंच किरण जगदाळे, ग्रामपंचायत सदस्या माधुरी चव्हाण, अविनाश ढोले, छबन राजपुरे, सुनील चव्हाण, सुनिल शिंदे, शिवाजी भोसले, प्रशांत जगताप, मोहन भोसले, संभाजी चव्हाण, भरत भोसले, किशोर चव्हाण, अभिजीत चव्हाण, बाळासो चव्हाण, निवृत्ती तांबे, रविंद्र शिंदे, दिनेश भोसले, दत्तात्रय भोसले, अक्षय जगदाळे, सोज्वल चव्हाण तसेच ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments