Type Here to Get Search Results !

पारंपरिक गजीनृत्य, ढोल-ताशा आणि वारकरी फुगड्यांच्या गजरात मोरेवाडीची बालदिंडी उत्साहात

 



डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मोरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केंद्र मुर्टी आणि अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही बालदिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक गजीनृत्य, ढोल-ताशांचा गजर, वारकरी फुगड्या, अभंग, ओव्या आणि भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे वयोवृद्धांच्या सहभागातून सादर करण्यात आलेले पारंपरिक गजीनृत्य. तसेच विद्यार्थ्यांनी लेझीम सादर करत दिंडीची शोभा वाढवली. दिंडीमध्ये विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत मुक्ताबाई यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांनी दारोदारी औक्षण करून स्वागत केले. रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रांगोळ्या काढून दिंडीचे स्वागत करण्यात आले.
दिंडीत वयोवृद्ध, महिला, तरुण, युवक-युवती आणि लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत वारकरी फुगड्या आणि भजनांचा आनंद लुटला.



या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजपुरेवस्ती, खोमणेवस्ती, लकडेवस्ती, कोळपेवस्ती आणि मोरेवाडी येथील ग्रामस्थ, पालक, युवक मंडळ तसेच शाळेचे शिक्षक संदीप गाढवे सर आणि पोपटराव गाडे सर तसेच अंगणवाडी सेविका मंगलताई मोरे व संगीताताई वाघमोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी शिक्षणप्रेमी ग्रामस्थ दत्तात्रय धायगुडे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय वाघमोडे यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना गोड मिष्टान्न भोजन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments