डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील पळशी येथे लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रस्त्याच्या कडेला विविध देशी फळझाडांची लागवड करण्यात आली.
या उपक्रमात नारळ, आंबा यांसह विविध प्रकारची देशी फळझाडे लावून परिसर अधिक हिरवागार करण्याचा संकल्प करण्यात आला. वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणासारखे उपक्रम समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी बाबासाहेब चोरमले यांनी सांगितले.
या कार्यक्रमास बारामती पंचायत समितीचे गटनेते बाबासाहेब चोरमले, नवनाथ कोळेकर, विठ्ठल कोकरे, विठ्ठल गुलदगड, भाऊसो कोळेकर, केतन कर्वे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन भाऊसाहेब केसकर यांनी केले. उपस्थितांनी लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प करत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Post a Comment
0 Comments