डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
झी इन्स्टिट्यूट, बारामतीचा पहिला वर्धापन दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सन्मान सोहळा आणि सिने कलाकारांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिने अभिनेते महेशदादा देवकाते होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट दिग्दर्शक घनश्याम येडे यांनी उपस्थित राहून कलाकार आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी मराठी चित्रपट 'डेरिंग द बारामती फाईल' मधील कलाकारांची विशेष उपस्थिती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
कार्यक्रमात बारामती परिसरातील सिने कलावंत, सुप्रसिद्ध रीलस्टार, वेबसिरीज कलाकार, पत्रकार, विविध क्षेत्रातील कलाकार, शिक्षक, इतर स्टाफ, हितचिंतक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी झी इन्स्टिट्यूटच्या एका वर्षातील उल्लेखनीय वाटचालीचे कौतुक करत संस्थेच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम, कलाकारांशी संवाद आणि विविध उपक्रमांमुळे संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे विशेष अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र वाघमोडे सरांनी, सूत्रसंचालन निवेदक विशाल बंडगर यांनी तर आभार राजेंद्र सोनवलकर यांनी मानले.



Post a Comment
0 Comments