डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त बारामती तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जळगाव सुपे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. उज्वल आरोग्य सेवाभावी प्रतिष्ठान आणि बारामती तालुका वारकरी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात दवाखान्यात कमी असणारी औषधे, विविध प्रकारची झाडे व औषधी वनस्पती लावून स्व. अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण आणि पुढील पिढीसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी उज्वल आरोग्य सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले. प्रतिष्ठानतर्फे सामाजिक व आरोग्यविषयक विविध उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमास मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. अश्विनी शिंदे, आरोग्य सहायिका सविता गायकवाड, समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपाली बंडगर, आरोग्य सेवक अक्षय शेंडगे, उज्वल आरोग्य सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगन्नाथ जगताप, वैभव भापकर, सिस्टर श्रद्धा दगडे, आशा सेविका शर्मिला जगताप, सुनिता जगताप, पुनम ठोंबरे तसेच जळगाव सुपे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत समाजहितासाठी वृक्षारोपणासारखे उपक्रम अधिकाधिक राबविण्याचे आवाहन केले. आरोग्य आणि पर्यावरण या दोन्ही क्षेत्रांना स्पर्श करणारा हा उपक्रम ग्रामस्थांनी कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली.


Post a Comment
0 Comments