Type Here to Get Search Results !

नियमित कर्ज फेडणाऱ्यांना दोन लाखाची मदत मिळावी व नाझरेतून ओव्हर फ्लोचे पाणी जिरायत भागाला मिळावे



डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी 

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची मदत मिळावी व नाझरे धरणातून ओव्हर फ्लोचे पाणी बारामती तालुक्यातील जिरायत भागात सोडण्यात यावे अशी मागणी जोगवडी येथील शेतकरी सुनील राजे भोसले यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे केली आहे.

   राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. परंतु, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी घेतलेला निर्णय मात्र योग्य नाही. त्यांनाही दोन लाख रुपयाचा लाभ मिळावा. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना शासनाकडून जाहीर झालेल्या अनुदानाचा फेरविचार करण्याची गरज जोगवडी येथील सुनिल राजेभोसले यांनी व्यक्त केली. कर्जमाफीबाबत ते म्हणाले की, कर्जाच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देत शासनाने मोठी मदत केली. परंतु, नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी घेतलेला निर्णय तितका योग्य नाही. नियमित कर्जफेड करणारे शेतकरी कर्ज भरण्यासाठी प्रसंगी घरातील सोनेनाणे गहाण ठेवून कर्ज भरत असतात. त्यामुळे कर्जमाफीवेळी नियमित कर्ज भरणाऱ्यांचा अगोदर विचार व्हायला हवा होता. कारण, नियमित कर्जफेड करणाऱ्यांमुळेच विकास सोसायट्या, जिल्हा मध्यवर्ती बँक या संस्थांना चांगली मदत झाली. शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्यांबाबत योग्य तो मदतीचा निर्णय घेत त्यांची नाराजी दूर करावी तसेच धरण क्षेत्र मध्ये पावसाचे प्रमाण जास्त असून अतिरिक्त नाझरे धरणातून ओव्हर फ्लोचे पाणी बारामती तालुक्याच्या जिरायत भागात सोडण्यात यावे अशी मागणी राजेभोसले यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments