Type Here to Get Search Results !

मुढाळे याठिकाणी मुर्डेश्वर महिला ग्रामसंघाची मासिक सभा संपन्न



 डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी

ग्रामविकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व पंचायत समिती बारामती यांच्या अंतर्गत वडगाव मोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये महिलांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्या अंतर्गत मौजे मुढाळे याठिकाणी मुर्डेश्वर महिला ग्राम संघाची स्थापना करण्यात आलेली आहे. 

 त्यासाठी दि. १४ ऑगस्ट रोजी मुर्डेश्वर महिला ग्राम संघाची मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी मुढाळे गावातील ग्रामसखी ज्योती दरेकर मॅडम तसेच वडगाव मोरगाव जिल्हा परिषद गटातील प्रभाग समन्वयक सिकंदर आत्तार यांनी उपस्थित महिलांना दिल्या जाणाऱ्या योजनांचे मार्गदर्शन केले.



  मुढाळे मध्ये उमेद अभियानाच्या कामकाजाची सुरुवात झाल्यापासून आज अखेरपर्यंत एकूण ३० महिला समुहांची स्थापना झालेली असून त्यापैकी महिलांच्या उद्योग व्यवसायासाठी उमेद अभियानाकडून २१ समूहांना एकूण ६ लक्ष १५ हजार रुपये खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तसेच CIF मधून आतापर्यंत १५ समूहांना ६०,००० प्रमाणे ९ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. VRF निधी मधून एकल, विधवा व परित्यक्ता महिलांना १.५ लक्ष निधी दिला आहे. तसेच एकूण १ कोटी १३ लक्ष रुपयापर्यंतचे विविध बँकांचे अर्थसहाय उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. महिलांचे उद्योग, व्यवसाय वाढीसाठी उमेद अभियानामार्फत विविध प्रकारचे लोणचे, पापड, मसाला बनवण्याचे प्रशिक्षण देखील ४० महिलांना देण्यात आलेले आहे. इथून पुढेही महिलांना पुरेपूर निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रभाग समन्वयक सिकंदर आत्तार यांनी सांगितले.



  या बैठकीसाठी ग्रामसंघाचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व समूहातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments